मोकळा श्वास!



आणि फायनली ट्रेन निघाली.
ती रिलॅक्स झाली. पण टेन्शन तर होतचं! पुढे काय होणार आहे काय नाही, काही काही म्हणजे काही माहिती नव्हतं. खूप मोठं पाऊल उचललं होतं तिने. खूप हिम्मत लागते असं काहीतरी करायला. तिची इच्छा खूप दिवसांपासून होती, पण फॅमिली कडे बघून ती शांत बसायची. सिरियसली घेणं तर खूप दूरची गोष्ट अगदी क्षणातच मनातली इच्छा मनातच मारून, विसरून पुढे जायची. ते रस्त्यात अचानक आलेला मोठा दगड कसा आपण इग्नोर करून बाजूने निघून जातो तसं ती नेहमी त्याला इग्नोर करून विसरून पुढे निघून जायची.

स्कार्फ सुद्धा नव्हता सोडला तिने महाराष्ट्र सोडेपर्यंत! उगाचच कोणी पाहिल म्हणजे? फक्त दोन तास! पण ते दोन तास सुद्धा डोक्यामध्ये विचारांचे तुफान मांडत होते! पुढे काय होणार आहे हा एकच प्रश्न होता. स्वतःच आणि आई-बाबांचं सुद्धा! त्यांची reaction! त्यांना धक्का बसेल, झोप उडेल. आई तर आजारी देखील पडेल.
पण आज हे करणं गरजेचं होतं. जर आज नसतं हे पाऊल उचललं तर पुढे आयुष्यात मोठं किंवा कम्फर्ट झोन च्या बाहेर जाऊन काहीही करण्याची हिम्मत कधीच नसती होऊ शकली तिला.

महाराष्ट्रातल शेवटचे स्टेशन आलं आणि तिने ठरल्याप्रमाणे मोबाईल डेटा ऑन केला . पाच मिनिटे थांबली, आणि मग परत बंद केला.
व्हाट्सअप चेक केलं. ऑडिओ आणि मेसेज सेंड झाला होता. ते तिने पाहिलं आणि फोन ऑफ केला.

इकडे आई-बाबांच्या पायाखालची तर जणू काही जमीनच सरकली होती.

"आई-बाबा... शांतपणे ऐकून घ्या, आणि समजून घ्या! मला माहित आहे तुमची काळजी आहे, प्रेम आहे! खूप जपतात तुम्ही मला. पण जास्त काळजी सुद्धा चांगली नसते. तुम्हाला चुकीचं नाही म्हणत आहे. प्लीज गैरसमज नका करून घेऊ. पण खरं तर हेच आहे कि तुमची ही काळजी मला बंधन वाटायला लागली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला बांधून ठेवलं किंवा बंधन घातलं. तसं अजिबात नाही. पण तुम्ही आमच्यात इतके गुंतलेले आहात ना की स्वतःचं आयुष्य विसरून गेला आहात. 
आता आपण स्वबळावर एकटे इतके सक्षम केलं आहे तर त्यांना गुंतवून न ठेवता उडू द्याव हे देखील तुमच्या लक्षात येत नाहीये. पण तुमचा जरी नसला तरी आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्या संस्कार आणि घडवणूकीवर. आणि आज त्याच विश्‍वासाच्या जोरावर मी निघाली आहे उडायला!

हो... मी जॉब सोडला आहे. पण काळजी करू नका दुसरा जॉब भेटला सुद्धा आहे. करिअर तुमच्या साठी असेल, पण माझ्यासाठी माझं काम म्हणजे माझं प्रेम आहे, स्वप्न आहे!
माझं दुसर प्रेम! पहिल प्रेम तर तुम्ही आहात ना! आणि कितीही काहीही झालं तरी आयुष्यात या दोन प्रेमापासून तरी या जन्मात दूर नाही जाऊ शकणार मी. मनाने दूर नाही जाऊ शकणार पण डिस्टन्स ने दूर जाऊ शकते. आणि आत्ता चाललेच आहे मी... तुमच्या पासून लांब...

'मी जॉब ला जात आहे' अस सांगून बाहेर फिरायला निघाले आहे. अनोळखी जागी, अनोळखी लोकांमध्ये... कारण त्याची गरज आहे मला!

गेले काही दिवस झाले मीच मला हरवल्यासारखी वाटत आहे. ना कशात मन लागत, ना घरात रमते, ना बाहेरच्या वातावरणात... बदलणारं वातावरण, राग, भांडण, काम, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही... सगळं सगळंच नको वाटतंय!

मला गरज आहे, बाहेर पडायची. बिनधास्त, एकटी फिरायची! प्रत्येक-न-प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायची, मनाला वाट्टेल ते करायची!

मला आवडतं फिरायला! खूप सुंदर सुंदर जागा आहेत या जगात, या देशात, आपल्या भारत देशात. मला त्या बघायच्या आहेत. निसर्गामध्ये खूप आत मध्ये जायचं आहे. निसर्गाचाच एक भाग व्हायच आहे. सगळं टेन्शन, कटकट, प्रॉब्लेम सगळं विसरून पूर्ण बिनधास्त फिरणार आहे मी.
हा...आता तुम्ही म्हणाल, 'आम्हाला टेन्शन मध्ये टाकून, आमची रात्रीची झोप उडवून, तू फिर बिनधास्त!' मला तेच सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही पण बिनधास्त व्हा! नका माझ्यामुळे त्रास करून घेऊ स्वतःला! कारण मी नाही त्रास करून घेत आहे स्वतःला! 
'तुझ्यावर अशी वेळ आल्याशिवाय, तू आई झाल्याशिवाय तुला कळणार नाही आमची काळजी" हो, खरं आहे, नाहीच कळणार! आणि म्हणूनच म्हणतीये जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत तरी एक मुलगी म्हणून, एक माणुस म्हणून जगू द्या! संसार, मुलं, काम, सगळं आहेच ना मग पुढे!

लग्न, संसार तर खूप दूरची गोष्ट. काम... ते तर आहेच की. येत्या महिन्याच्या एक तारखेला मला जॉईन व्हायचंय. 
आणि मी काही कायमची नाही चाललीये. काही दिवसांची गोष्ट आहे. जरा फिरुन, मनाला वाटेल ते करून, मी लवकरच परत येणार आहे. काळजी करू नका. स्वतःच्या जीवावर बेतेलं किंवा तुमचा नाक कापेल असं काही नाही करणार. तशी शिकवण नाही तुमची.

बस, मेजर चेंज ची गरज आहे. नवीन जॉब, नवीन महिन्यासोबत, एक आयुष्याची नवीन सुरुवात करेल, फ्रेश... नवेपणाणे! आणि तेच नवेपण अनुभवता यावे त्यासाठी तरी रेडी व्हायला हवं ना...!

बस काही दिवस मी कुठे आहे, कुणासोबत आहे, हे नाही सांगणार. तुम्ही पण मला शोधायचा प्रयत्न करू नका. फोन बंद असेल. जसं आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा करेल चालू, आणि करेल तुम्हाला कॉल. 
काळजी घ्या स्वतःची. मी घेत आहे माझी.
And please wish me luck for my journey.
तुमच्या आशीर्वादाची गरज आहे."

आणि अशाप्रकारे, त्या लाडाने वाढलेल्या लेकीने, सगळ्यांच्या कम्प्लीट प्रोटेक्शन मधून स्वतःला बाहेर काढलं. Comfort zone मधुन बाहेर पडली.
स्कार्फ सोडला... आणि ट्रेनच्या दारात येऊन थांबली.

पंचवीस वर्ष जगत असून सुद्धा, आज पहिल्यांदा श्वास घेत होती. "मोकळा श्वास!" 
त्या वाहणाऱ्या वार्‍याला अनुभवत होती...
झाडे, पाने... अनेकदा पाहिली असली, तरी आज पहिल्यांदाच खरं तर त्यांना ओळखत होती. 
खळखळ वाहणारे पाणी...आणि तो अथांग पसरलेला समुद्र... तिच्या नवीन वाटचालीसाठी जणू दिशाच दाखवत होते.
हा निसर्ग पहिल्यांदाच पाहिला नसला, तरी आज पहिल्यांदाच त्याच्या प्रेमात पडत होती. आणि तो पण आधार देत होता. सांगत होता तिला, "तु एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्या सोबतीला! घे तु आपला बिनधास्त मोकळा श्वास!"

Comments