चक्रीवादळ मनातलं...




चक्रीवादळ... किनारपट्टीवरचं नाही, मनातलं!

सतत सतावणाऱ्या विचारांचं...

काय, का, कसे, कुठे, कधी या न संपणाऱ्या प्रश्नाचं...

आणि पुढे काय होईल या यक्ष प्रश्नाचं...


चक्रीवादळ हे मनातलं...

कालच्या आठवणींचं आणि उद्याच्या स्वप्नांचं...

कोण आहे सोबत आणि कोण असणार पुढे या भीतीचं...


चक्रीवादळ हे मनातलं...

रोज अनेकदा अयशस्वी होऊनसुद्धा 

रोज नव्याने जिंकण्याच्या प्रयत्नांचं...


चक्रीवादळ हे मनातलं...

प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याचं

आणि ठरवलेल्या मार्गावरून यश गाठण्याचं...


चक्रीवादळ हे मनातलं...

स्वप्न पूर्ण करण्याचं, स्वतःला सिद्ध करण्याचं

आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं...


चक्रीवादळ हे मनातलं...

कितीही दाबलं मनात तरी उफाळून बाहेर येणार...

सगळं काही नष्ट करणारं...

आणि नष्ट करूनही पुनर्निर्मितीचा मार्ग दाखवणारं... 

Comments