To Say or Not to Say ?

People who know me, (Not like 'see, that's Pratiksha Kulkarni!.' People who actually know me), do know that what kind of Confusing but straight forward and bit strict kind of a person I am. They also have an idea about my "Angry" & so called "childish" behaviour(or someone who call or look at it as a "Cute Behaviour"). 
People do know that how talkative I am!
And sometimes I am so straight forward! But when I realised that someone got hurt by my words(unknowingly most of the times) I am like "To say or not to say ?,
Should I just shut my mouth or they do owe an apology?
.
My mom is telling me since last 10-12 years "जरा कमी बोलत जा, विचार करून बोलत जा!" And it's not like I never tried.
But you know na guys, "स्वभावाला औषध नाही!"
पण मी प्रयत्न केले.
पण ते असत ना, जोपर्यंत एखादी गोष्ट मनाला लागत नाही ना तोपर्यंत आपल्यावर परिणाम होतच नाही.
आपण ठरवायचं असतं, "एखादी गोष्ट बदलावी" की मग "आपण जसे आहोत तसे स्वतःला पुर्णपणे accept करावं आणि त्यालाच आपली ability, plus point मानुन त्याचा योग्य तसा वापर करावा."
आणि कधी ना कधी हे ठरवायची वेळ येते!
.
माझा आयुष्यात ती वेळ दोनदा आली.
.

1st - जेव्हा मी दहावीत होते.

शाळेचं शेवटचं वर्ष. सगळ्यांचं आवडीचं वर्ष. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा. अभ्यासचा आणि आठवणी बनवण्याचा. आयुष्यभरासाठी पुरतील एव्हढया आठवणी बनवण्यात सगळे busy असतात. पण त्याच वर्षातली मी मात्र किती जणांना आठवते हे एक खूप प्रयत्न करून आठवायचीच गोष्ट असावी!
नाही, मी शाळेत गेले नाही असं नक्कीच नव्हतं.
नाही मी कोणाला दोष देत आहे!
Actually, मे तेव्हा होतेच तशी! Rude, चिडकी, विचित्र!
आणि म्हणूनच पूर्ण वर्ष माझा, जवळच - हक्काचं असं कोणी नव्हतं तेव्हा. होते ते सगळे फक्त जेवढयाच तेवढे राहणारे. बरेच जण मला टाळायचे सुद्धा.
मला अजून आठवतंय, माझा birthday कोणाच्याच लक्षात नव्हता. सरांना चॉकलेट दिल तेव्हा कळलं काहींना पण तरी कोणी wish नव्हतं केलं.
Farewell आमचं - सगळ्या मुली छान साडी नेसुन, तयार होऊन आलेल्या. फोटो काढत होत्या. पण माझा मात्र कोणासोबत सुद्धा फोटो नाही. कोणाला मी आठवत देखील नाही.
मग आला board exam चा शेवटचा दिवस. सगळे पेपर झाल्यावर पार्टी करत होते, एन्जॉय करत होते आणि मी मात्र एकटी घरी बसले होते.
पण तेव्हा, जेव्हा मी घरी एकटी बसले होते तेव्हा ठरवलं, "स्वतःला बदलायचं!" हा स्वभाव आपल्याला लोकांपासून दूर नेतोय, आपल्याही नकळत hurt करतोय. त्याचा त्रास आपल्या स्वतःला देखील होत आहे. आणि हा काय खूप चांगला स्वभाव नाहीये. चूकत आहे आपण. मग आता ती
चूक सुधारायला पण तर हवी ना!
आणि मी त्याप्रमाणे स्वतःला समजून घेऊन स्वतःला बदलत गेले. बऱ्यापैकी फरक पडला आहे.
त्याचा result म्हणजे तेच सगळे दहावीतले, ज्यांना मी आठवत नाही असे माझे मित्र आज माझे friends आहेत. आम्ही फक्त भेटतो किंवा गप्पा मारतो अस नाही तर त्यातले काही बऱ्यापैकी; तर काही खूप छान ओळखतात सुद्धा मला. कळत-नकळत हक्काचे अशी माणसं झालेली आहेत ती आता, atleast माझ्यासाठी तरी. त्यांच्यासाठी सुद्धा मी तेवढी जवळची आणि हक्काची आहे. (पण तरी एकदा त्यांच्याकडून, त्यांच्या life मधली माझी जागा काय आहे हे ऐकायला नक्की आवडेल मला.)

2nd - is last year! Year 2018!


मागच्या वर्षी ना, मी माझ्याबद्दलची काही वाक्य वारंवार ऐकली.
"खूप बोलते, आणि कुठे थांबायचं हे नाही कळत तीला."
"Its okay, समजु शकते, लहान आहेस ना अजून! नाही कळणार तुला!"
"बालिश आहेस अजून तु!"
"नको बाबा, चीडेल ती !"
आणि हे सगळं बोलणारे approx माझाच वयाचे बरं का...
.
मी साधी फोटो साठी हसले, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल excited झाले तरी लगेच मला बालिश म्हटलं जायचं.
भूक लागल्यावर चिडचिड होते आणि हे खूप नॉर्मल आणि कॉमन आहे पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस बोलल्या गेलेल्या एखाद्या गोष्टीवरून मला चिडकी ठरवून झाले.
ते काही प्रमाणात बरोबर आहेत, नाही म्हणतच नाहीये. पण प्रत्येक वेळेस नाही. आणि सारख सारख हे बोलणं देखील कितपत बरोबर आहे?
या वेळेस सुद्धा मला त्रास झाला, मी खूप hurt झाले. अनेक वेळा घरी येउन आई जवळ रडले देखील.
का रडले मी ? ते मला बोलतात म्हणून? नाही !
मी रडले कारण मी त्यांना कोणाला कधी त्यांच्या स्वभावावरून काहीच नाही बोलले. त्यांना जस माझ्या स्वभावतल्या काही गोष्टी आवडत नव्हत्या, तसंच मला पण तर त्यांच्या काही गोष्टी नव्हत्या आवडत. पण मी कधी काही नाही बोलले! कारण, i know how it feels and I don't want to hurt anybody. I don't want to give that feeling to somebody else just bcz they did that to me.
And more than that,  मला या गोष्टीचा त्रास व्हायचा की यार, मी समोरच्याला जस आहे तस accept करते मग समोरचा का नाही मला आहे तसं accept करत?
पण या वेळेस मी स्वतःला बदललं नाही!
कारण बाकीच्यांनी करो न करो पण मी मात्र स्वतःला पुर्ण समजून घेऊन accept केलंय!
मी फक्त शांत झाले. माझं बोलणं ७०-८०% कमी झालं.
Again... कोणालाही blame नाही करत आहे!
कारण ते म्हणतात ना, जो होता है, अच्छे के लिए होता हैं।"

माझ बोलणं कमी झालेलं पण मग विचार करणं खुप वाढलेलं. आणि मग
त्याच दरम्यान blog लिहायची idea भेटली एका कडुन!
आणि मी लिहायला लागले....
जेवढ कधी बोलले नव्हते, बोलू शकले नव्हते तेवढ सगळं लिहायला लागले. खूप हलकं, चांगलं आणि समाधानी वाटत प्रत्येक blog लिहिल्यानंतर!
त्यात आता विचार करून बोलायची आणि लिहायची एक चांगली सवय लागली जी की खूप आधी try करत होते. पण actual मध्ये आत्ता परिणाम दिसू लागलाय जरा जरा!
कोणीतरी bore होईल हे नाही वाटत आता. कारण जरी कोणी bore झालं तरी मला कळणारच नाहीये ना....
आणि सगळ्यात important म्हणजे, मी लहानपणी जे एकदा बाबांना म्हटले होते की, "मी मोठी होऊन लेखिका होणार" त्या स्वप्नाची वाटचाल चालू झाली म्हणा किंवा एक try तरी करत आहे म्हणा. Obviously, स्वतःला लेखिका अजिबात नाही म्हणून घेणार आहे(आत्तातरी). पण त्या स्वप्नाचं १०% तरी सत्य झालंय.
Now, it's been a year that I have started Writing and Blogging. I am saying, what I really want to say without any fear or tension.
I am learning, trying. Trying to share stuff, which can inspire or entertain someone. 
और कुछ नहीं तो atleast, 5 minutes कुछ पढ लेंगे लोग. और उनके वो 5 minutes वेस्ट नहीं जाएंगे इतनी तो guarantee दे ही सकती हूं।
आणि या सगळ्यामध्ये खरंच खुप आनंद भेटतोय, समाधान भेटतय.
तुम्हाला पण मला हेच सांगायचं आहे!

चांगले विचार करा. मोठी स्वप्न बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून जे हवं आहे त्याचा विचार करा. Bcz, our life is nothing but Reflection of our Thoughts!आज किंवा उद्या नाही पण कधी ना कधी ते नक्की पुर्ण होतील.100% नाही पण 10% तरी पुर्ण होतील. आणि तुम्हाला समाधान राहील की "मी प्रयन्त तरी केला!"  तो आनंद पण खूप मोठा आहे बर का आणि! कळेल तुम्हाला तेव्हा!


Comments

  1. Sorry but not everyone can read Marathi! Like me, so can we get the hindi or english version also?

    ReplyDelete

Post a Comment