गोष्टी


"लहानपण देगा देवा!" 
खरचं...
तस तर सगळ्यांचच लहानपण खूप मस्त असत, पण माझं, एका गोष्टीमुळे जरा सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जास्त मस्त होत... अस मला तरी वाटत म्हणजे.
"गोष्टी" मुळे. हो, "गोष्टी" मुळेच !
.
मी आज बोलता बोलता माझ्या मैत्रिणीला एका गोष्टीचा reference दिला तर she was like, 'काय बोलतीयेस तु ?'
म्हटलं, 'अग...लहानपणी गोष्ट ऐकली नाही का ? आठवत नाही ?'
आणि ती चक्क "नाही" म्हणाली. तिने गोष्ट ऐकलीच नव्हती.
आणि आज मला इतक्या वर्षांनी कळलं की गोष्ट सांगणें, ऐकणे हे common जरी असलं तरी सगळ्यांच्या घरात नाही होत.
.
माझं लहानपण तरी almost गोष्टी ऐकण्यातच गेलय.
मी चौथीमध्ये जाईपर्यंत एक दिवस असा गेला नसेल जेव्हा मी गोष्ट ऐकली नसेल . रोज रात्री पप्पांकडुन गोष्ट ऐकायची आणि मगच झोपायचं हे जणू ठरलेलंच होत. आणि पप्पासुद्धा रोज वेगळी गोष्ट सांगायचे तेही उत्साहाने
चंपक वनातल्या बोलणाऱ्या, नाचणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी!
इतिहासात होऊन गेलेल्या राजांच्या गोष्टी!
महाभारत-रामायण मधल्या गोष्टी!
आपले जे स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी!
आणि न जाणो काय काय !
पण खरी पंचाईत मात्र आईची व्हायची तेव्हा, जेव्हा बाबा बाहेरगावी जायचे! की आता हिला गोष्ट सांगणार कोण ?
तरी ती देवांच्या, चातुर्मासाच्या पुस्तकातल्या, पेपरमध्ये येणाऱ्या वगेरे गोष्टी सांगायची.
दादाकडे मी अनेकदा हट्ट करायची की आज तूच मला गोष्ट सांगणार म्हणून पण तो मात्र नेहमीच मला हाकलून लावायचा! तसा कधी कधी सांगायचा सुद्धा... पण त्याच्या गोष्टी ठरलेल्या.
पहिली : कापुस कोंड्याची गोष्ट !
आणि दुसरी : एक म्हातारी होती, ती लहानपणीच मेली !
So... in short... तो माझा पोपट करायचा.
.
अनेक वर्षे होत माझं हे गोष्टीच पुराण....
मग एकदा आई बाबा म्हणाले, "आता तुला वाचता येत  तर पुस्तकं वाचत जा! आणि मग तर काय मला तर जणू काही नवीन छंदच लागला म्हणा की. सारखी घरात नवीन नवीन पुस्तकं यायला लागली. चंपक, चांदोबा, ठक ठक, आणि अजून बरेच! वयाप्रमाणे पुस्तकांची रूप आणि प्रकार बदलायला लागले. माझे बाबा सुद्धा नेहमी माझ्या वाढत्या वयाला आणि बदलणाऱ्या विचारांना लक्षात घेऊन पुस्तके आणायची.
मला अजूनही आठवतं, दर गणेश चतुर्थीची मी अगदी आवर्जुन वाट बघायची. का तर त्या मंदिरात दर चतुर्थीला एक आजी आजोबा पुस्तकांचा stall लावायचे. आणि मला कोणतं पुस्तक घेऊ आणि कोणत नको असं व्हायचं. बाबा आधीच सांगायचे, एकच पुस्तक घ्यायचं हा! मग काय मी खूप विचार करून, आधी ४ पुस्तक short list करून मग त्यातले २ पुस्तक घ्यायची. आणि पुढच्या महिन्यात कोणत पुस्तक घ्यायचं हे पण ठरवून ठेवायची.
त्या गोष्टी च्या माझ्या सवयीमुळेच इतिहास, मराठी, हिंदी हे विषय माझे नेहमीच आवडीचे झाले. Specially इतिहास.
त्यामुळेच पेपर वाचायची सवय अगदी चौथीत होती तेव्हाच लागली (आता ही गोष्ट वेगळी की मोठी झाल्यावर ती सवय सुटली). बालमित्र, चिंटू तर अगदी आवडीचे झाले.
.
पण आता काही लोकांना रामायण महाभारत नाही माहीत हे ऐकून खरच shock होते. पु. ल. माहीत नाही कळल्यावर तर रागच येतो ! आणि हे सगळे माझ्याच वयाचे बरं का.
माझ वाचन आत्ता नक्कीच कमी झालंय पण गोष्ट ऐकणं, वाचणे अजूनही खूप आवडते. बाकीच्यांसारखे english authors नाही माहीत मला, harry potter तर आत्ता काही महिन्यांपूर्वी पाहिला मी.
मला नाही माहीत हे सगळं चूक बरोबर काय आहे ? Out-dated आहे का...तर मला तरी नाही वाटत.
फक्त इतकंच कळतंय आणि समजतंय की ज्या लहान वयात मुलं खूप पटकण गोष्टी आत्मसात करतात, सवयी आयुष्यभरासाठी लागतात तेव्हा आपण कमी वेळात पण समजूतदारपणे, common sense ने, आणि हुशारीने खूप काही गोष्टी शिकवू शकतो. पण तेव्हा just because आपलं काम व्हावं किंवा त्याने शांत व्हावं म्हणून त्याच्या हातात मोबाईल देतो! त्याला TV समोर बसवतो आणि मग मोठं झाल्यावर जेव्हा तो मोबाईल मध्ये डोकं घालून बसतो, तेव्हा "काय तर छंद लागलाय ना?" अस म्हणून ओरडतो.
.
मी स्वतःला, आम्हाला आणि आमच्या आधीच्या generation ला खुप lucky समजते जेे तेव्हा मोबाईल नव्हते.
नाहीतर इतर अनेकांप्रमाणे मला (किंवा आम्हाला, depends on reader) सुद्धा कापूस कोंड्याची गोष्ट माहीतीच नसती. And i really dont think की ती आता कोणाला सांगीतली तरी कळेल.
कारण शेवटी कितीही म्हटलं तरी पालथ्या घड्यावर पाणीच ना !

Comments

  1. Khup ch mast.. ya ghosti mule ch aplyala na kalat khup mahiti milte.. je itar dusri kadun kadhich milnar nhi.. ani ghosti iknyacha Anand ch vegla asto..

    ReplyDelete
  2. Mast g........Amazing....... Outstanding......... Fabulous....... Fantastic.........
    Awesome ............. Kharach Yarrrrr Khup mast

    ReplyDelete
    Replies
    1. Outstanding...... Awesome..... Fab fabulous....... Great pratttuuuu

      Delete

Post a Comment