चूक माझीच आहे...




चूक माझी आहे... हो, चूक माझीच आहे!

चूक माझीच आहे... जे मी लहानपणापासूनच मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं...
चूक माझीच आहे... जे मी घडण्याचा आणि घडवण्याचा विचार केला...
चूक माझीच आहे... जे मी माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम केलं आणि त्यांचा जीव गुंतवून ठेवला...

चूक माझीच आहे... जे मी स्वतःची नवी ओळख बनवण्यासाठी प्रयत्न केला....
चूक माझीच आहे... जे आई-बाबांच्या नजरेत माझ्याबद्दल proud feeling असल्याचं स्वप्न उराशी बाळगलं...
चूक माझीच आहे... जे त्यांच्या आरामदायी 'उद्यासाठी' माझा 'आज' एन्जॉय करणं बाजूला ठेवलं...

हो... चूक माझीच आहे... जे या जगात मुलीला बाहुली समजून हवं तसं खेळवणाऱ्या लोकांना मी जन्म दिला...
चूक माझीच आहे... जे अश्या नराधमांची कधी बहीण, कधी मैत्रीण, कधी बायको तर कधी मुलगीसुद्धा झाले...
चूक माझीच आहे... जे माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघितलं गेलं आणि माझ्या अंगावर हात टाकला गेला...
चूक माझीच आहे... जे अश्या लोकांना घाबरून मी जन्म घेणं नाही थांबवलं...

चूक माझीच आहे... जे मी जगातल्या वाईट गोष्टींचा विचार करतच जगायला शिकले...
चूक माझीच आहे... जे वाईटाला घाबरून, तोंड बंद करून घरात बसून राहिले...
चूक माझीच आहे... जे माझ्या मुलीला, बहिणीला आणि आईलासुद्धा घरातच बसायला सांगितलं...

चूक माझीच आहे... जे मी आहे ते स्वीकारत गेले...
चूक माझीच आहे... जे मी बदल घडवायचा प्रयत्न केला...
चूक माझीच आहे... जे मी कधीतरी बदल घडेल हा विश्वास ठेवला...

चूक माझीच आहे... जे कितीही प्रॉब्लेम्स आले तरी मी मात्र strong राहायचं ठरवलं....
चूक माझीच आहे... जे हार मानून स्वतःला संपवण्याऐवजी मी लढायचं ठरवलं...

चूक माझीच आहे... जे स्वतःची ओळख बनवायचं ठरवलं...
चूक माझीच आहे... जे कोणाच्याही पैश्यांवर मजा न मारता स्वतः पैसे कमवायचं ठरवलं...
चूक माझीच आहे... जे मी नवऱ्याच्या नावाने ओळखलं जाण्याआधी स्वतःच नाव कमवायचं ठरवलं...

चूक माझीच आहे... जे मी संसाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी दिवस-रात्र कष्ट केले...
खरॊखरच चूक माझीच आहे... जे career, family, health हे सगळं कर्तव्य म्हणून सांभाळता सांभाळता #AllRounder tag लावून घेतला...

चूक माझीच आहे... जे सगळ्यांना माझी सवय लावली... इतकी की मी नसली की कामं अडतातच सगळ्यांची....
चूक माझीच आहे... जे मी मुलांना चांगलं जीवन देण्यासाठी मेहनत घेतली...
चूक माझीच आहे... जे 'आई-आई' म्हणणाऱ्या मुलांनीच आज 'आई' शब्दाला शिवी बनवली आहे...

चूक माझीच आहे... जे मी प्रत्येक नातं जपण्यासाठी, फुलवण्यासाठी प्रयत्न केले...
चूक माझीच आहे... जे मी स्वतःसोबतच माझ्या माणसांना पण पुढे नेण्याचा विचार केला...

अश्या अनेक चुका दिसतील तुम्हाला हो माझ्या....
पण खरं सांगू का? माझी ना.... तसं बघायला गेलं तर चूक फक्त एकच आहे.....
.
.
.
.
ती म्हणजे मी एक मुलगी म्हणून जन्माला आले!

Comments