Changing Equations!



"नैना....नैना... अगं माझा laptop...
तुझ्याकडे आहे होय! मी शोधतीये सगळीकडे.
पण, मला सांग आज college नाही ठीक आहे, पण चक्क माझा laptop घेऊन घरात कशी तु?"

"अगं आई, photos बघतीये.... राज आणि यश च्या पाहिल्या birthday  पासूनचे. कसे दिसायचे बघ ना ते!"

"Hmmm... पहिला birthday काय, त्यांच्या जन्मानंतरचा पहिला photo सुद्धा मीच काढला आहे. त्यांच्या दोघांच्या आई-बाबांचं लग्नाचं shoot पण माझ्या team ने च केलंय.आहेत बघ photos तुला बघायचे असतील तर."

"किती भारी ना तुमची फ्रेंडशिप! तू, बाबा, यश चे आई बाबा, आणि राजचे आई बाबा... सगळे कधीपासून एकत्र आहेत ?"

"मी, यश चे बाबा, आणि राज चे बाबा आम्ही तिघे एकाच शाळेत होतो. लहानपणापासून एकत्र! मग सगळ्यात आधी राजच्या बाबांचं लग्न झालं. मग माझं, आणि त्यानंतर यशच्या बाबांचं. एक-दीड वर्षातच तिन्ही लग्न झाली. इनफॅक्ट तुझ्या बाबांना पण मी राजच्या आई-बाबांच्या लग्नातच भेटले होते. आणि सात आठ महिन्यांनी लग्न! माझं आणि राजच्या बाबांचं लव मॅरेज. फक्त यशच्या बाबांच अरेंज मॅरेज. पण तरी त्याच्या आईने आमची फ्रेंडशिप खूप छान समजून घेतली हा... I really respect her. She is such a good soul!

 "किती छान आहे नाही हे सगळं... तुमची फ्रेंडशिप! 
माझी यशची आणि राजची फ्रेंडशिप सुद्धा अशीच रहावी कायम. काय माहित आता काय होणार आहे आमचं ? आमची फ्रेंडशिप पण तुमच्यासारखी टिकेल का नाही डाउटच आहे. फक्त आमच्यामुळे तुमच्यात काही प्रॉब्लेम यायला नकोय ग आई मला!"

"नैना.... तुमची भांडणं काही नवी नाहीत, कधी पटलं का तुमचं ? But it doesn't mean की तुमची फ्रेंडशिप तुटेल आणि फ्रेंड्स नाही एकमेकांना त्रास देणार तर कोण देणार आणि तुला काय वाटतं आम्ही कधी भांडत नाही? राज च्या बाबांना विचार किंवा यशच्या बाबांना... सांगतील तुला किती मस्ती, भांडण आणि मारामारी व्हायची आमची... i mean मी मारायचे....! खूप त्रास द्यायचे मी यांना आणि अजूनही देते. तुमचं तर त्यासमोर काहीच नाही. हा आता तू माझी मुलगी शोभतेस हे नेहमीच म्हणतात ते दोघे! एवढी मजा मस्ती चालतेच आणि."

"तसं नाही ग... जाऊदे तुला नाही कळणार. it's complicated !"

"it's complicated ???
Ohhh....माझी मुलगी मोठी झाली म्हणायची...
म्हणे complicated... बोला... काय झालंय ?"

"नाही ग... काही नाही! नेहमीचंच! Ignore !"

"Love Triangle?"

"अं..... ???"

"हो ना... love triangle च तो!"

"आई, तुला कसं कळलं?"

"आई आहे मी बाळा तुझी... मला नाही तर काय शेजारच्या काकूंना कळणार आहे का तुझ्या मनात काय चाललय ते ?
बोल आता चल...
तुझ्या आईला काय outdated समजलीयेस का? जी आई तुझ्याशी sex, drugs याबद्दल बिनधास्त बोलते, तिच्याशी Love-relationship बद्दल बोलायला तुला कधी पासून tension यायला लागलं?"

"Tension नाही गं! I mean तुझ्याशी बोलायचं tension नाही, त्या दोघांशी बोलायचं आहे. कळत नाही काय आणि कसं बोलु ?"

"मग आधी माझ्याशी बोल! May be i can help you? आणि तुलाही कळेल, तुला काय वाटतं ते!"

"यश... यशला मी आवडते असं सगळे म्हणतात. मला देखील यशच्या behaviour मधून ते अनेकदा जाणवल आहे पण तो कधी स्पष्ट बोलला नाही. नेहमी friend च म्हणतो.
आणि राज... राजला पण मी आवडते आणि मलासुद्धा राज आवडतो. तो खुप छान आहे ग... म्हणजे यश पण चांगला आहे आणि मला त्याला कधीच गमवायच नाहीये. Actually राज ने मागच्या आठवड्यात मला propose केलं! मी आणि राज इतके भांडायचो पण कधी आवडायला लागलो एकमेकांना कळलंच नाही ग आई ?
I mean, its love or just an attraction ? खूप confusion आहे ग आई... मला दोघेही माझ्या life मध्ये हवे आहेत. आमची friendship नाही तुटू द्यायचिये. आणि त्या दोघांमध्ये देखील काही problems नको आहेत. कळत नाहीये गं आई काय करू मी ते...यश च तर वागणच बदलय आजकाल, त्याला कळयल का? का मग मी स्वतःच सांगू ते पण नाही कळते.

"दोघांना सोडून दे...!"

"काय ???"

"हो.... दोघांना सोडून दे!"

"ए यार आई.... तुला नाही आवडते हे सगळं तर सांग स्पष्ट, पण हे असलं काही नको सांगूस. जाऊदे नाही तर, काही बोलूच नकोस तु... तुला नाही कळणार!"

"मला नाही कळणार?"
"खरचं आहे म्हणा... नाहीच कळते मला!
नैना.... You are just 19 now!  आयुष्य संपल नाहीये तुझं! आताशी सुरू झालंय infact. तू आत्ता दोघांना फक्त friends मानलं, किंवा दोघांपैकी एकाला निवडलं, तरी देखील तुमच्या friendship चे equations change होणार हे नक्की! आज तुमच्या मध्ये problems होतील, पण ते कोणत्या नात्यामध्ये नाही होत ग? It's just that की थोडा time द्यावा लागतो आणि तो दिला ना की सगळं नीट होत सुद्धा! फक्त हे आपल्याला तेव्हा नाही कळत! आयुष्यातली प्रत्येक वेळ, प्रत्येक नातं काही तरी शिकवून जात. आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होत, फक्त आपला दृष्टिकोन चांगला आणि positive thinking हवी. आणि अश्या वेळेस आपल्या आजूबाजूच्या लोकांचा directly-indirectly खूप परिणाम होतो. कोणी मुद्दाम तर कोणी जाणूनबुजून काही उचापती करतात आणि त्याचा आपल्यालाच त्रास होतो. पण आपण अशावेळेस शांत राहायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाला explanation द्यायला जायचं नाही आणि नाही कोणाचा इतका strong प्रभाव होऊ द्यायचा आपल्यावर की आपल्याला त्रास होईल! प्रत्येक जण त्याला काय दिसतंय त्यावरून त्याला काय वाटतय हेच बोलत असतं.  पण जो actualy त्या situation मध्ये असतो त्याची condition खुप वेगळी असते. कोणी ठरवून किंवा सांगून सुद्धा नाही समजून घेत. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असतो! And now its your time to become strong, and you have to be strong my baby!

आणि आता सगळ्यात important, अस का वाटत तुला की हे दोघेच आहेत या जगात?
ते खूप चांगले आहेत नो डाऊट! पण तुला काय माहित तुझ्या आयुष्यात उद्या काय होणार आहे? आणि कोण येणार आहे ? तुला काय गॅरंटी आहे की तुझा लाइफ पार्टनर राजच असेल किंवा यशच असेल ?  आणि जरी समज असला तरी i don't think, you have to think about it now! आणि love-relationship या गोष्टी पूर्णपणे आपल्या हातात नसतात. Love & accident या गोष्टी जेव्हा व्हायच्या आहेत आणि जशा व्हायच्या आहेत तशा आणि तेव्हाच होणारेत. जर असेलच या दोघांपैकी कोणी तर तो आज दूर निघून जाईल पण नंतर परत सुद्धा येईल.
Because true love comes back! True love never dies! It's destiny. And destiny do know how to play her game. And we cannot change it, no matter what!

आणि तसही सगळ्यात महत्वाचं म्हणचे मुली आधीच बदनाम आहेत दोन मुलांची फ्रेंडशिप तोडण्यामध्ये, and I really don't want YOU to be part of it!"
Personal experience वरून बोलतीये... So think....!"

" ठीक आहे! मी दोघांनाही नकार दिला. आणि आमची फ्रेंडशिप maintain केली आणि जसं तू म्हटलीस तसं परवा माझ्या आयुष्यात तिसरा आला तर तो हे सगळं accept करेल ? आमची फ्रेंडशिप त्याला आवडली नाही तर ?"

"तर... तर मी एवढंच सांगेल आता...... की यश आणि राज.... दोघांच्याही बाबांनी मला propose केलं होतं. मी राजच्या बाबांना हो बोलले होते आणि आज तुझे बाबा आदित्य आहेत ज्यांना हे सगळं माहिती आहे!"

Comments