नखरे !


"नखरेच आहेत हिचे तर....!,
हा नेहमीच अस करतो...!
तिचा स्वभावच आहे तो.... कधी सुधारणार देव जाणे....!"

"स्वभावाला औषध नाही" हे सगळ्यांना माहीत आहे...
वेळेनुसार आणि गोष्टींनुसार माणूस बदलत जातो,
आज ना उद्या बदल घडणार, हे सगळ्यांना माहीत आहे... तरी आपण नेहमीच लोकांच्या स्वभावाबद्दल बोलतो...!
फक्त बोलत च नाही तर taunt ही मारतो...
त्या व्यक्तीने बदलावं अस वाटत....
आणि सारख सारख बोलून दाखवून देतो पण कधी हा विचार नाही करत की त्या माणसाला काय वाटत असेल....
त्याची life story अशी आहे जे तो आज असा झाला आहे...
कधी विचार केलाय स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेऊन ?
कधी पहिली आहे त्याची life त्याच्या नजरेने ?
नाही तर मग तुम्हाला काही हक्क नाही त्याला अश्याप्रकारे judge करायचा.....
आपण का नाही accept करु शकत त्या माणसाला तो आहे तसा.?
तुमची असते ना इच्छा की "आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला मदत करावी, आपलं ऐकून घ्यावं" 
मग तसच त्या व्यक्तीची पण अपेक्षा असू शकते ना ?
बोलत नाहीये म्हणून डोक्यावर नाही बसू यार....
तुम्हाला त्याची एक गोष्ट नसेल आवडत, पण बाकीच्या काहींना आवडत असेल... and most importantly त्याची पण तर काही story असेल जे तो आज असा आहे ....

हो.... काही स्वभाव असतात ना जन्मजातच ....
पण आपल्याला माहीत आहे ना की स्वभाव कधी नाही बदलत... त्याला नाही कोणतं औषध...
आणि जन्मजात स्वभाव तर कधीच नाही जात... हा काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकतो... तो माणूस ती गोष्ट control करू शकतो...
पण कायमचा निघून जाईल....
Huhhh..... मग I guess तुमचा जरा जास्तच अपेक्षा करायचा स्वभाव आहे....  नका करू बरं दुसऱ्याकडुन इतक्या अपेक्षा... नाही ना झाल्या पूर्ण तर त्रास होईल हो फार....

प्रत्येकाची thinking, life story, choice वेगळी आहे....
आपल्याला जे पटत नाही ते may be दुसऱ्याला खूप आवडतं असेल. पटत असेल.... So it's ohkay na dude ! Take a chill pill yaar... Accept it !
आपल्याला काय पटत नाहीये ते सांगण - is okay !
पण सारख सारख बोलण, चिडवणं, त्याची मजा घेणं हे कितपत बरोबर आहे बरं ?
त्याला वाईट पण वाटत असेल ना यार....
तो बोलत नाही म्हणून काय तुम्ही बोलतच राहायचं का?

अनेक वर्ष एकत्र राहिल्यावर सुद्धा couples मधे स्वभावाला घेऊन भांडण होतात... अरे... तुम्हाला माहिती आहे ना स्वभाव...! मग पटत ते घ्या... नसेल पटत तर ignore करा..! भांडत काय बसताय ? तुमचा पार्टनर पण तर तुम्हाला सहन करतोच आहे ना... जास्त झालं तर शांत पणे समजून सांगा.... भांडण काय solution आहे का ???? 

बघा बाबा.... करा विचार...
Be proud of what you are ! 
And accept other person as they are !
तेवढाच जरा तुमच्या डोक्याचा ताण कमी होईल ! 
तसही खूप साऱ्या बाकी गोष्टी आहेतच की ताण घ्यायला...!

Comments