Maturity !

तू ना लहान आहेस अजून... ?
ती तर खूपच बालिश आहे बाबा... ??
असा का वागतो हा ? लहान बाळा सारखा ???
जरा तरी Maturity येऊ दे !
.

असे वाक्य बऱ्याच वेळा ऐकले असतील, आणि बोललाही असाल.
असतात आपल्या आजू बाजूला अस कोण ना कोण.
आणि बऱ्याच जणांना ते बालिश लोक आवडत देखील नाहीत.
.
पण लहानपण मात्र सगळ्यांना आवडत....
.
लहानपण .....
सगळ्यांच्याच life मधला सगळ्यात सुंदर काळ.
मोठे झाल्यावर पण आपल्याला जो आठवतो, आवडतो आणि हवा हवासा वाटतो....
.
वाटत ना परत ती पाटी-पेन्सिल घेऊन बसावे.
चित्रं रंगवावी.
पावसातल्या पाण्यात कागदाची होडी करून सोडावी.
शाळेतल्या त्याच बाकावर जाऊन बसावं.
चिखलाने भरेपर्यंत खेळावे.
बोबडे शब्द बोलून बाबांचा राग शांत करावा.
आणि मग आई च्या हाताने तो मऊ मऊ भात खावा.

.
वाटत ना अजून पण ????
.
पण आता आपण मोठे झालो आहोत, नाही का???
आता जर तस काही केलं तर आपल्याला सगळे बालिश म्हणतील!
हो ना ???
.
असतात काही जण बालिश !
नाही होत काही जण वयाप्रमाणे मोठे !
घडतात काही लोकांच्या life मध्ये काही गोष्टी, जे बनवतात त्यांना त्यांच्या वयापेक्षा पण मोठे !
खरच.....
पण सगळ्यांची life, story, thinking, विचारसरणी, आजू-बाजूचा परिसर, friends, family... सगळं same तर नसत ना.....
आपण मोठे आहोत it doesn't  mean की आपल्या age च्या बाकी लोकांनी पण आपल्या सारख मोठं च असावं.
आणि बालिशपणा बद्दल म्हणायचं तर तो सगळ्यांमध्येच असतो.
कमी - जास्त... पण असतो...
बालिशपणा तरी नक्की काय आहे बर ?
तुम्ही जर नीट Observ केलं तर तुम्हाला पण कळेल...
"दुनियेची फिकर न करता स्वतःची Life Fully Enjoy करणं,
स्वतःच्या इच्छा पूर्ण करणे,
खुश रहाणे "

हेच दिसेल तुम्हाला Mostly....
त्यातही आता negative आहेच कुठेतरी काहीतरी.
But its okay na...
येईल त्यांचीही वेळ. शिकवेल त्यांनाही ही दुनिया !
.
लहान - मोठे यावर lecture नाही देत आहे बरं....
.
फक्त एवढच सांगायचंय की , कधी कधी दुनियेला विसरून स्वतःची दुनियादारी करायला आणि ती दुनियादारी पुर्णपणे एन्जॉय करायला बालिशपणा च Confidence देते.
खोटं वाटत असेल तर आठवून बघा, स्वतःचे लहानपणीचे किस्से ! उद्योग !
तेंव्हा नकळत केलेल्या गोष्टी आता करायची हिम्मत होईल का ?
काही कळत नसताना पण खुप मोठा तिर मारलेला असेल...
आठवून तर बघा !
.
मोठे आहोत, म्हणून मोठ्यांसारखा विचार करूनच, किंवा कांहीतरी difficult path निवडुनच सगळे प्रॉब्लेम solve होतात, किंवा खूप काहि तरी चांगलं होत अस नसत...
Simple, साधा, सरळमार्गी आणि सोपा मार्ग पकडून पण आपण आपल्या Destination ला पोहचू शकतो !
.
आणि तसही
खोटं बोलणं म्हणजे मोठे होण नाहीं.
तू बालिश आहे असं ४ वेळा बोलल्याने तुमची maturity prove होत नाही.
समोरच्याला Control केल्याने तुम्ही मोठे असल्याचे दिसत नाही.
.
And.... 'Maturity' ला मराठी मध्ये 'समजूतदार' असाही शब्द आहे !
So.... It's not about Childishness and Maturity !
It's about "Understanding"

.
जर तुम्ही समोरच्याला जस आहे तस Accept करू शकत नसाल,
स्वतःला त्याच्या जागी ठेऊन समजून घेऊ शकत नसाल,
तर काय कामाची तुमची ती So called Maturiy ?
.
समजनेवली बात है ना यारो.....
कोणीही Perfect नसत.
प्रत्येकामध्ये चांगलं - वाईट, गुण - दोष, Plus - Minus असतंच असत.
आपल कधीही कोणाशीही पूर्णपणे नाही पटू शकतं .
कारण आपण सगळे वेगळे आहोंत.
.
पण याचा अर्थ असा नाही की पटवून घ्यायचंच नाही.
थोडी Adjuatment, थोड Ignore करावंच लागत.
जो जसा आहे तसा त्याला, त्याच्या चांगल्या - वाईट, गुण - दोषांसह Accept करण Prove करतं तुमचा मोठेपण!

.
स्वतःला पूर्णपणे ओळखा.... अगदी प्रत्येक छोट्या मोठ्या गुण - दोषांसह accept करा स्वतःला !
Change ची गरज आहे की नाही हे तुमचं तुम्हाला च कळेल...
But atleast Be Proud of Yourself !
एकदा का स्वतःला समजून घेतले ना, मग दुसऱ्याला समजून घेणं अवघड नाही जात !
.
And about Childish Behaviour ....
ते पण maturity इतकच गरजेच आहे !
बालपण गेलंय निघून.... पण आता मोठे होण्याच्या नादात मनातला तो थोडासाच शिल्लक असलेल्या लहानपणापासून पिच्छा नका सोडवू....
Life will get bored !
.
बघा, पटतंय का ?
स्वतःलाच कळेल स्वतःची Maturity !

Comments

Post a Comment