आणि ती उडत होती.... उंच... उंच....
गुरुत्वाकर्षण आज पहिल्यांदाच अनुभवत होती!
इतक्या Height वरून खाली बघताना सगळंच किती सुंदर भासत होतं. हजारो feet वरून खाली पडताना अजिबात भीती वाटत नव्हती.
तिचं ते कित्येक वर्षांचं स्वप्न ती आज सत्यात अनुभवत होती.
SKY DIVING !
Heightवरून पडून मरत नव्हती... Don't worry! पण हा... आता तिची मरायला देखील काही हरकत नव्हती.
पूर्ण जग बघायचं स्वप्न तसं अजून पूर्णपणे पूर्ण नव्हतं झाला पण तरी देखील या एका क्षणात तिला पूर्ण जग दिसत होतं.
पहिल्यांदाच इतकं खळखळून वाहणार निळं-शार पाणी बघत होती. पृथ्वीवर 70℅ पाणी आहे हे आज पहिल्यांदाचआणि एका नजरेत दिसत होतं तिला...
हिरव्या पालवी ने नटलेली जमीन तिला खूपच सुखावत होती...
मनुष्य नावाचा प्राणी तर कुठे दिसताच नव्हता...आणि बहुतेक त्यातच आनंद होता!
स्वतःच्याच धुंदीत वाहणारे ते वारे... तिलाही... तिच्याही नकळत, धुंदीत नाचवत होते...
आणि ती देखील हात पसरवून प्रत्येक क्षण आणि क्षण आत्मसात करत होती... अनुभवत होती. एक आणि एक सेकंड अनुभवत होती.
मनात साठवत होती त्या feelings! नजरेत साठवत होती... ती सुंदर सृष्टी!
एक आणि एक क्षण खऱ्या अर्थाने जगत होती ती आज. अखेर पृथीतलावर जन्म घेतल्याचं सार्थक तरी झालं....!
असाच तिने तरंगत रहावं... अनुभवत राहावं....
काहीच कसलेच विचार नाही डोक्यात. कामाचा ताण नाही. काही कामच नाही करायला...
फक्त हात पसरवून एक आणि एक क्षण पूर्णपणे जगणे... That's it!
What a relief......
सुंदरता... शांतता...
आणि तेव्हड्यात एक टी-टी चा आवाज यायला लागला....
खूप राग आला तिला... कोण आहे हे सगळं खराब करणारं? एक कानफडात ठेऊन द्यावीशी वाटली....
आणि म्हणून शोधायला लागली तर...
तर...
तर डोळे उघडले....
अलार्म होता तो...
सकाळचे 7 वाजलेले....
उठणं गरजेचं होतं...
कारण आता 5 मिनिटं जरी उशीर झाला असता उठायला तरी आवरायला उशीर झाला असता आणि मग रोजची ती 8 ची बस miss झाली असती... मग ऑफिसला उशीर... late mark... बॉसची बोलणी खा..
सगळ्या दिवसाची वाट लागणार म्हणजे....
असा सगळं दिवसभराचा ताण एका सेकंडमध्ये तिच्या नजरेसमोरून गेला आणि ती पटकन उठली!
कारण स्वप्न कितीही सुंदर आणि आवडणारी, हवी-हवीशी वाटणारी असली तरी हे रोजच रुटीन गरजेचं होतं!
स्वप्न, स्वप्नच राहील होतं आणि मनाला सध्या पटत नसलं तरी Reality accept करण भाग होतं!
एक समाधान मात्र नक्की होतं... स्वप्न पाहिल्याचं!
कारण तिचा विश्वास होता... तिच्या स्वतःवर... तिच्या स्वप्नांवर !

Thank you so much
ReplyDelete